Sunday, April 14, 2024

आणखी एक बळी; नांदेडमध्ये एसटी कंडक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट आगारात होते वाहक पदावर कार्यरत

नवीन नांदेड- एसटी आंदोलनाच्या फेऱ्यात अडकलेल्या आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. नांदेडच्या वसरणी भागात राहणाऱ्या भीमराव नागोराव सदावर्ते या बस कंडक्टरने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे. मयत भीमराव सदावर्ते (वय 57 वर्ष) हे सध्या किनवट आगारात वाहक पदावर कार्यरत होते.

भीमराव नागोराव सदावर्ते हे S.T. कर्मचाऱ्याच्या आंदोलनामुळे तणावात होते असे सांगण्यात येते. वसरणी भागातील प्लॉटवरील वीटा रचलेल्या रुमच्या पत्राच्या खालील लाकडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आज सकाळी ९ वाजता मुलगा प्लॉटवर गेला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब ग्रामीण पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भीमराव सदावर्ते यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, सदावर्ते यांच्या घरी तसेच शासकीय रुग्णालयात एसटी महामंडळाच्या वाहक, चालक व नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

याप्रकरणी नागेश भिमराव सदावर्ते (वय २९ वर्षे, व्यवसाय शिक्षण रा. जयहिंद पार्क, वसरणी ता.जि. नांदेड) यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आ.मृ. नं. 124/2021 कलम 174 CRPC दि. 26/12/2021 नुसार नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास  पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे हे अधिक तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!