Thursday, March 28, 2024

नांदेडमध्येही मिळणार पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस; पाईपलाईन प्रकल्पासाठी 1200 कोटी मंजूर; खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नाला यश

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मुंबई, पुणे या शहरांप्रमाणे नांदेडमध्येही पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस मिळू शकणार आहे. यासाठीच्या नांदेडमधील पाईपलाईन प्रकल्पासाठी 1200 कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.

प्रदुषणमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात नैसर्गिक गॅस पाईपलाईनचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या या महत्वकांक्षी प्रकल्पात नांदेड जिल्हयाचा समावेश करुन नांदेड शहरासह जिल्हयातील 8 लाख कुटूंबांना नैसर्गिक गॅस पाईपलाईनने जोडण्यासाठी 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पास तत्वता मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्यांच्या टीमने नांदेड शहराला भेट देवून पाहणी केली असल्याची माहिती नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

केंद्र सरकारच्या नॅचरल गॅस प्रकल्प योजनेत नांदेड जिल्हयाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडला हा प्रकल्प मंजूर करण्यात यावा अशी शिफारसही केंद्राकेड केली होती. गेल्या दोन-तीन वर्षाच्या कालावधीत खासदार या नात्याने तत्कालीन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व विद्यमान पेट्रोलियम मंत्री सरदार हारदीपसिंघ पूरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन या प्रकल्पास मान्यता मिळवून घेण्यात आपणास यश आले आहे असे खा. चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेडचा गॅस पाईपलाईन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पीएमजीआरबीकडून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. एमएनजीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम आज शुक्रवार दि. 4 मार्च 2022 रोजी नांदेडमध्ये दाखल होवून प्रकल्पाला लागणाऱ्या मुलभूत सुविधांविषयी चर्चा करून त्यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. नांदेड शहरासह लोकसभा मतदारसंघातील 8 लाख कुटूंबियांना थेट घरगुती गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. बुलढाणा ते नांदेड 270 कि.मी.ची मुख्य पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुकास्तरापर्यंत गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. नांदेड गॅस प्रकल्पाच्या डिटेल फिजीबील्टी रिपोर्टच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर हे स्वच्छ, स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल इंधन म्हणून घरगुती वापरासह औद्योगिक क्षेत्रालाही गॅसचा वापर करता येणार आहे. वाहन इंधन म्हणूनही सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात पुरवठा सुरू करण्यात करण्यासाठी जिल्हयात 170 सीएनजी पंपची उभारणी करण्याचा समावेशही या प्रकल्पात करण्यात आला आहे. खासदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात एमएनजीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्यांच्या टीमची बैठक होवून नांदेड गॅस प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड शहरासह जिल्ह्यात हा पॅकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम 8 लाख कुटूंबियांना घरगुती गॅस पाईपलाईनव्दारे जोडले जाणार आहे. सिलेंडरपेक्षाही हे गॅस 20 ते 25 टक्के कमी दरात उपलब्ध होणार असून स्वस्त, सेफ, प्रदुषण मुक्त इंधन म्हणून प्रथम वापरानंतर ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. नांदेड जिल्ह्यात हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी वेळेत सुरुवात केले जाईल. पेट्रोल व डिझेल यासारख्या पारंपारिक ऑटो इंधनांना पर्याय म्हणून स्वच्छ, स्वस्त, पर्यावरणपूरक हरित इंधन आणि घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना नॅचरल गॅस प्रदान करणे हे एमएनजीएलचे उद्दीष्ट आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला लायसन्स प्रदान केले आहे. त्यामुळे येत्या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात नॅचरल गॅस पाईपलाईनने जोडले जाणार असल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!