Friday, December 6, 2024

आदिवासीबहुल किनवट तालुक्यात बारमध्ये चक्क लाखोंच्या उलढालीचा जुगार अड्डा; जुगाराच्या साहित्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, 31 जुगारी अटकेत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड/ किनवट– आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातील मांडवी येथील नंद बारमध्ये चक्क जुगार अड्डा सुरू असल्याचे आढळून आले आहे. झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळल्या जाणाऱ्या या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी 31 आरोपींना अटक करून रोख दीड लाख रुपये, जुगाराचे साहित्य आणि वाहने असा एकूण 23 लाख 61 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील हवालदार सुरेश घुगे, शेख चांद आणि उदयसिंह राठोड हे किनवट तालुक्यातील अवैध धंदे, फरार आरोपींच्या शोधात गस्तवर होते. सोमवारी दि. २३ मे रात्री त्यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने मांडवी येथील धनलाल पवार यांच्या नंद बारच्या मागील एका रूममध्ये जुगार सुरू असल्याची माहिती घेतली. पोलीसांनी मांडवी पोलिसांची  मदत घेत त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. जुगार अड्ड्यावरून एक लाख 46 हजार दोनशे वीस रुपये, बावीस लाख 15 हजार 500 रुपयांचे जुगार साहित्य आणि वाहने असा एकूण 23 लाख 61 हजार 723 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे या परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. सर्व आरोपींना अटक करून मांडवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. मात्र एक आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरला. उदयसिंह राठोड यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जमिया खान हे करत आहेत. पथकाचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.

यावेळी धनलाल पवार, संपत राजावीर रेड्डी, भास्कर सुदर्शन चिलेरू, श्रीनिवास गौड मलागौड, तिरुपती पोचंमा मडगू, रमेश गंगाराम पेदाबोईन्ना, हरी गोपाल पोचय्या बोनेगिरी, तुळशीराम नरसय्या संगा, अप्पालाड सतीश सबय्या, के शंकर पोसम, के उमेश राजारेड्डी, शंकर राजेश्वर, टी. संतोष मधुकर, रमेश राजय्या, श्रीकांत लक्ष्मणय्या या जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!