Thursday, September 19, 2024

आधी मोटारसायकल चोरी नंतर नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरांच्या टोळीला अटक; चोरीच्या तीन मोटरसायकली, लॅपटॉप व आठ मोबाईल जप्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- आधी मोटरसायकल चोरायची आणि नंतर त्याच मोटरसायकलवर नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळीला वजिराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ मोबाईल, तीन मोटारसायकली, लॅपटॉप असा सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांनी शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सक्रीय गुन्हेगारांची चेकींग करणे, पोलीस ठाणे हद्दीमध्ये लावण्यात आलेले क्युआर कोड स्कॅनिंग करीत शहरात सतत पेट्रोलींग चालु ठेवणे, रात्री अपरात्रीचे वेळी फिरणाऱ्या लोकांना अटकाव करुन त्यांचेकडे सखोल चौकशी करुन कायदेशिर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सदर सुचनेच्या अनुषंगाने चंद्रसेन देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर) व जगदीश भंडरवार (पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजिराबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार पोहेकॉ दत्तराम जाधव, पोना शरदचंद्र चावरे, गजानन किडे, मनोज परदेशी, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगुलवार, शेख ईम्रान शेख एजाज, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वेस्टेशन रोड याठिकाणी अभिलेखावरील गुन्हेगार शेख सलमान शेख निसार रा. तेहरानगर नांदेड व शेख अशफाक शेख रज्जाक राहणार नुरी चौक नांदेड हे अस्पष्ट नंबर असलेल्या पल्सर मोटरसायकलवर आढळुन आल्याने त्यांना मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल पार्डी ता. लोहा येथुन चोरी केल्याची माहिती दिली. त्यांना पोलीस ठाणे येथे आणून अधिक चौकशी केली असता शेख सलमान शेख निसार याने दोन दिवसापूर्वी नर्सी ता. बिलोली येथून एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन लोहा व रामतिर्थ येथे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली.

सदरचे आरोपी हे अभिलेखावरील सक्रीय गुन्हेगार असल्याने त्यांना अधिक विश्वासात घेउन विचारणा केली असता आरोपी शेख सलमान शेख निसार याने त्याचे साथीदार आरोपी शेख शाहेद शेख इब्राहीम व तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने अंदाजे 15 ते 20 दिवसापूर्वी राजकॉर्नर याठीकाणी रात्री अंदाजे तीन साडेतीन वाजताचे सुमारास एक व्यक्ती रेल्वेस्टेशन येथुन घरी जात असतांना त्यास अडवून मारहाण करुन, खंजरचा धाक दाखवून त्याचेकडील लॅपटॉप व मोबाईल फोन चोरी केल्याची घटना सांगितली. त्याबाबत खात्री करुन पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गु.र.न. 420/2022 कलम 394,34 भारतीय दंड विधान सह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली.

सदरील सर्व आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून चोरीच्या दोन मोटरसायकली, गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल चोरी केलेला लॅपटॉप व मालकी हक्क नसलेले आठ मोबाईल असा एकुण 3 लाख 22 हजार रुपयाचा ऐवज जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे. सदर प्रमाणे केलेल्या कारवाई केल्याबद्दल वरिष्ठांनी वजिराबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!