ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

आजचा गुवाहाटी येथील व्हिडीओ 👇🏻
नांदेड- गुवाहाटी येथे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे काल बंडखोर आमदारांचे फोटो काढले जात असताना लपण्याचा प्रयत्न करताना दिसून आले होते. पण आज पुन्हा बंडखोर आमदारांचे फोटो काढले जात असताना गुवाहाटीत त्यांना समोरच्या रांगेमध्ये खुर्चीत बसवण्यात आल्याचे दिसून आले. त्यांचा आजचा हा फोटो आणि व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संबंधित बातमी 1 👇🏻
काल सर्व बंडखोर आमदारांसह आमदार बालाजी कल्याणकर यांचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत सुरतमधील हॉटेलमध्ये सर्व बंडखोर आमदारांचे फोटो काढताना ते लपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आ. कल्याणकर यांच्याकडून चेहरा लपविण्याचाही प्रयत्न करण्यात येत असल्याचे या व्हिडिओत दिसून आले. शेजारच्या आमदारांनी नीट उभे राहा असे सांगितल्यानंतर ते पुढे आल्याचेही व्हिडिओत दिसून आले.
संबंधित बातमी 2 👇🏻
त्यानंतर आज सर्व बंडखोर आमदारांचा आणखी एक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यात आज मात्र आमदार बालाजी कल्याणकर यांना खुर्चीवर बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे. खुर्चीत आणि तेही अगदी पुढच्या रांगेत आमदार कल्याणकर बसलेले दिसत आहेत. आ. कल्याणकर यांच्या अचानक बदललेल्या या ‘पोझिशन’ची जोरदार चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटून आल्याचा दावा करणारे कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी आजच पत्रकार परिषदेत बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचा दावा केला आले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे बंडखोर नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गोटातील काही आमदारांना व मंत्र्यांना सुरतला घेऊन गेले होते. त्यानंतर आता सर्व बंडखोर आमदार आसामच्या गुवाहाटीत आहेत.
कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी आपली शिंदे यांच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्याची माहिती आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याशी बोलणे करून दिले, परंतु त्यांचा फोन मध्येच अचानक बंद झाला. आमदार बालाजी कल्याणकर हे उद्धव ठाकरे यांच्या गोटात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येते असा दावाही त्यांनी केला. या सर्व प्रकारांमुळे नांदेड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
