Tuesday, December 3, 2024

आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीला अपघात; अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने आमदारांच्या गाडीला ठोकले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

लोहा (जि. नांदेड)- नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. लोहा येथे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसने आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकले असून यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

लोहा शहर व  तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. जादा फेऱ्यां मारण्याच्या नादात अवैध प्रवासी वाहतूक करणारे बस व काळीपिवळी टॅक्सीचालक भरधाव वेगात गाड्या चालवित असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यातच हाही अपघात झाला आहे.

शुक्रवार दि.२३ डिसेंबर रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोनी सेंटरजवळ नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची इनोव्हा गाडी क्रमांक (एमएच २६ सीडी ०९०९) ही थांबलेली होती. नांदेडहून कंधारकडे अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या खासगी बस क्रमांक (एमएच १४ बीए ९५७४) या चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे गाडी चालवून या इनोव्हा गाडीला पाठीमागून धडक दिली. यात गाडीचे इंडीकेटर फुटुन मागचा भाग दबला गेला. सुदैवाने यात कोणालाही काही दुखापत झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खासगी बस चालकाला अटक करुन बस पोलीस स्टेशनमध्ये लावली आहे. लोहा शहर व तालुक्यात लोहा, सोनखेड, माळाकोळी अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे.  मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जादा प्रवाशी वाहनात कोंबून भरधाव वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. यात लोहा व सोनखेड हद्दीतून कंधारचे खासगी बसवाले भरधाव वेगाने गाड्या चालवीत आहेत.

आमदारांच्या गाडीवर लावले जाणारे विधानसभा सदस्यांचे स्टीकर लावलेल्या या इनोव्हा गाडीत आ.मोहनराव हंबर्डे यांचे पुतणे नरसिंग धारोजीराव हंबर्डे हे लोहा येथील सोनी साडी सेंटर येथून कपडे खरेदी करून लातूरकडे  नातेवाईकांकडे जात असताना सदरील घटना घडली. याप्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!