Tuesday, October 15, 2024

सरकार बदलताच इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीत लढलेल्या व्यक्तींना पुन्हा सुरू होणार मानधन; अर्ज करण्याचे शासनाचे आवाहन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

सन्मान योजना नव्याने सुरू; पात्रताधारकांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड– तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना पूर्वीप्रमाणेच निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा लाभार्थींना हे निवृत्ती वेतन देण्यात येणार असून पात्रताधारकांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आणीबाणीच्‍या कालावधीत (सन 1975 ते 1977) मधील लढा देणाऱ्या व्‍यक्‍तींना सन्‍मान / यथोचित गौरव करण्‍यासाठी योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेत शासनाद्वारे मानधन दिले जाणार आहे. पात्रताधारक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

ही योजना नव्‍याने सुरु करण्‍यास 28 जुलै 2022 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. या योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 10 हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 5 हजार रुपये मानधन देण्यात येईल. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक 5 हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस 2 हजार पाचशे रुपये मानधन अनुज्ञेय राहील. आणिबाणीच्‍या लढयामध्‍ये सहभाग घेतलेल्‍या व्‍यक्‍ती ज्‍यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्‍यांनी अर्जाचा नमुना परिशिष्‍ट अ व शपथपत्राचा मसुदा परिशिष्‍ट ब मध्‍ये माहिती व आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्‍या प्रमाणित प्रतीसह अर्ज सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर यापूर्वी २०१८ मध्ये आणीबाणी काळात तुरुंगवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आघाडी सरकारने सत्तेवर येताच लॉकडाउनमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या विपरीत परिणामाच्या पार्श्वभूमीवर खर्चात काटकसर करण्यासाठी असे सांगून ही योजना ३१ जुलै, २०२० रोजी बंद केली होती. पण आता हे मानधन पूर्वीप्रमाणेच देण्यात येणार आहे. योजना बंद झाल्याच्या कालावधीपासून योजना मंजूर झालेल्या व्यक्तींना थकबाकी देण्यात येणार आहे. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!