Thursday, September 19, 2024

उदगीरच्या ९५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीर नगरी सज्ज !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अजय-अतुल यांच्या संगीत मैफिलीने जिंकली प्रेक्षकांची मनं !

उदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २२, २३ आणि २४ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे पार पडणार आहे. या संमेलनाची तयारी ही पूर्ण झाली असून यजमानपद मिळालेली उदगीर नगरी ही सज्ज झाली आहे. तर काल रात्री झालेल्या संगीत रजनीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या संगीत मैफिलीने उदगीरकरांची मने जिंकली.

उदागीर बाबांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या उदगीर शहरात पहिल्यांदाच अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या ३६ एकरातील विस्तीर्ण मैदानात हे ९५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या मैदानाला ‘भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आलं आहे. जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली हे तीन दिवसीय संमेलन येत्या २२ ते २४ एप्रिल चालणार आहे. ज्याचे उदघाटन २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाचा समारोपाला २४ एप्रिल रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण अशा भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीच्या मैदानात होणाऱ्या या संमेलनात मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे भारत सासणे यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांच्यासह संपूर्ण टीम तसेच हजारो हात परिश्रम करीत आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ३१० कर्मचारी तसेच तसेच १२०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. या साहित्य संमेलनास देशभरातील ३५० साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आलंय. तर त्यांच्या राहण्यासाठी उदगीर इथे १४० रूम, लातूरमध्ये ४०, शेजारील कर्नाटक राज्यातील बिदर इथे ३० रूमची सोयही करण्यात आली आहे. १० हजार लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची तसेच ०४ हजार लोकांसाठी चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली आहे.  मुख्य मंडपात एकाचवेळी ३५ हजार नागरिक बसू शकतील अशी बैठक  व्यवस्था करण्यात आली. तीव्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे १०० जम्बो कुलर तसेच शेकडो पंखेही संमेलनस्थळी बसविण्यात आले आहेत. याशिवाय थंड पाणी बॉटल आणि थंड पिण्याच्या पाण्याचे जारही उपस्थितांची तहान भागविण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वाहनांची सोय ही याच ठिकाणी १२ एकरच्या वाहनतळ व्यवस्थेत करण्यात आली आहे. अति महत्वाच्या व्यक्तींसाठी ०६ हेलिपॅडही उदगीरमध्ये बनविण्यात आली आहेत. मुख्य व्यासपीठाशिवाय ०७ व्यासपीठही तयार करण्यात आली आहेत.     

दरम्यान काल रात्री सुप्रसिद्ध संगीतकार-गायक अजय-अतुल यांच्या संगीत मैफिलीचे  ‘भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी’त आयोजन करण्यात आले होते. ज्याला उदगीरकरानी मोठी गर्दी केली होती. आज झी मराठी वरील प्रसिद्ध असा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहेत. ज्यात भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, सिद्धेश्वर झाडबुके आदी कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. एकूणच तीन दिवस अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी उदगीरमध्ये झाली असून उदगीर नगरी ही एखाद्या नवरी सारखी नटली असून प्रत्येक जण हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. तर कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही संमेलन स्थळी तसेच उदगीर शहरात तैनात करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!