ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड जिल्हा समन्वयक संदीप देशमुख यांची माहिती
नांदेड- सरकार सातत्याने ग्रामीण भागावर आणि गावच्या प्रश्नावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत गावगाड्याच्या मागण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 22 डिसेंबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत एक दिवस बंद ठेवत असल्याचे सरपंच परिषदच्या वतीने जाहीर करण्यात आले, अशी माहिती नांदेड जिल्हा समन्वयक संदीप देशमुख यांनी दिली आहे.
प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले की,राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचा दिवाळी दसरा सरकाने गावचा वीज पुरवठा कमी करून अंधारात घातला आज वीज महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा बिले देऊन ग्रामपंचायच्या पाणी पुरवठ्याची कनेक्शन तोडली असल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित असल्याने अनेक गावात पिण्याचा पाणी पुरवठा बंद आहे.
सरपंच यांनी कोरोना काळात प्रचंड काम करून सुद्धा सरपंच याना गावात लसीकरण कमी झाले म्हणून अपत्रतेच्या नोटिसा आणि शासकीय अधिकाऱ्यांना मोकळे रान हा प्रकार खेदजनक असून सरकार चुकीचे निर्णय घेत असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले. गावच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोरोना काळात मोर्चे आणि रास्ता रोको करण्यापेक्षा आम्ही ग्रामपंचायात बंद ठेवत आहोत यावर ही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री मंत्री, विरोधी पक्ष नेते याना या बाबत अठरा मागण्याचे निवेदन दिले असून त्यात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1. पंधराव्या वित्त आयोगामधून कुठल्याही प्रकारची कपात न करता थेट ग्रामपचांयतीस स्थानिक विकासात्मक कामे करण्यासाठीच वित्त आयोगाचीरक्कम खर्च करण्यात यावी
2. कोरोना काळात काम करत असतांना राज्यात जवळ पास ३0 पेक्षा अधिक सरपंच यांचे निधन झाले त्यांच्या कुटूंबाला आर्थीक मदत करण्यातयावी.
3. सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात साचीवा प्रमाने वाढ करावी.
4. पंतप्रधान आवास योजना अंर्तगत ड यादीच्या घरकुलाचे सर्वेक्षण करतांना अनेक चुका झाल्या आहेत त्या पुन्हा दुरूस्त करण्याबाबत निर्णयव्हावा केंद्र सरकारला या बाबत राज्य सरकारने पाठपुरावा करावा
5. संगणक चालक हा ग्रामपंचायतचा कर्मचारी समजण्यात यावा व त्यांना नियुक्त करण्याचे अधिकार ग्रामपचायतींना असावेत सी एस सीकंपनीकडून ग्रामपंचायत आणि संगणक चालक पर्यायाने जनतेच्या पैशाची लुट होत असून है तात्काळ थांबण गरजेचे आहे.यासह आदीमागण्यांवर योग्य विचार न झाल्यास आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत याचे परिणाम सरकारला गावची जनता दाखवून देईल असा इशारा देण्यात आला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻