Saturday, November 9, 2024

उमरीत गटसाधन केंद्र अंतर्गत विषय साधन व्यक्तींनी दाखविले अंद्धश्रद्वधेवर प्रात्यक्षिक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

 
उमरी- पंचायत समिती गटसाधन केंद्र उमरीचे विषय साधन व्यक्ती नंदेश्वर प्रमोदकुमार यांनी चला शिकूया या प्रयोगातून अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिक दाखवले आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बितनाळ येथे चला शिकू या प्रयोगातून विज्ञान या उपक्रमा अंतर्गत  गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील विषय साधन व्यक्ती नंदेश्वर प्रमोदकुमार आसाराम यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखविले. यामध्ये प्रयोग क्र.(१) माचीसचा वापर न करता आग लावणे, (२) नारळ मधून रक्त सांडणे, (३) हवेला दाब असतो यावर जादुई पद्धतीने प्रयोग, (४) जादुई पद्धतीने माचीसच्या तुटलेल्या काड्या जोडणे,या चारही प्रयोगावर प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. यामागे कोणत्याही प्रकारचा जादू किंवा तंत्र मंत्र नसून हे सर्व विज्ञानाचे चमत्कार आहेत, यावर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अशाच प्रकारचा कोरोना हा सुद्धा एक आजार आहे त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी वारंवार हात धुवावेत, मास्क लावावीत,व आपल्या कुटुंबातील १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करून घेण्यासाठी प्रेरीत करावे  इत्यादी सूचना विद्यार्थ्यांना देऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल बितनाळचे विद्यार्थी, व शिक्षक उपस्थित होते. तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा बितनाळ येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक संपतवार भगवान, शिक्षक वडमिले लक्षुमन, घोगरे यु.एस, मोटरवार, व्हि.बी.कल्याणकर, एम.बी.देवधर, एस.एस.तांबरे, आर.जी.ब्रम्हगिरी एम.डी.आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यावेळी  घोगरे यु.एस. यांनी शाळेच्या वतीने विषय साधन व्यक्तीं नंदेश्वर यांचे आभार मानले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!