ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या भावसार चौक भागात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीदरम्यान नाकाबंदी लावण्यात आली आहे. या नाकाबंदी दरम्यान पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचे पथक वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनांमध्ये एक कोटी पाच लाख रुपये आढळून आले. सदरची रक्कम ही जप्त करण्यात आली असून नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे.
शहरातील भावसार चौक येथे भाग्यनगर पोलिसांनी तपासणी नाका लावला आहे. या ठिकाणी ये- जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांची टीम वाहनांची तपासणी करत होती. यावेळी मालेगावकडे जाणारी बोलेरो क्रमांक (एमएच१२ टीव्ही ४०१६) ही थांबविली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात एक कोटी पाच लाख रुपये आढळून आले.
सदरची कॅश ही एसबीआय बँकेची असल्याचे सांगण्यात आले. वाहनही बँकेचेच असल्याचे सांगण्यात आले. परंतु निवडणूक काळामध्ये अशा वाहनावर क्यूआर कोड अनिवार्य असतो. तो कोड लावला नसल्याचे आढळून आल्याने सदरची रक्कम जप्त करून नांदेड उत्तर एआरओ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या वाहनावर क्यूआर कोड लावण्याचे का टाळण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत असून यातून विविध शंका निर्माण झाल्या आहेत. सदर रक्कमेबाबत निवडणूक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
