Friday, July 19, 2024

एक लाख रुपयाची लाच घेणाऱ्या डॉक्टर पती- पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल, डॉक्टर पतीला अटक, नांदेड एसीबी पथकाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• रक्तपेढीचा योग्य निकाल देण्यासाठी घेतली एक लाख रुपये लाच

नांदेड– एक लाख रुपयाची लाच घेणाऱ्या डॉक्टर पती- पत्नीविरुद्ध नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. नांदेड एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे.

शहरातील डॉक्टर लेन परिसरात असलेल्या एका रक्तपेढीचा कार्यालयीन तपासणी अहवाल योग्य देतो असे म्हणून सुरुवातीला धाराशिव येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर महिलेने दहा हजार रुपये स्वीकारले व त्यानंतर त्याच मोबदल्यात त्यांच्या पतीने एक लाख रुपये शुक्रवार दिनांक 8 मार्चच्या रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्वीकारले. ही लाच स्वीकारताना नांदेडच्या एसीबी पथकाने त्याला अटक केली. डॉक्टर दांपत्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय उदगीर, जि. लातुर अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी, (वर्ग -१), प्रादेशिक रक्त संक्रमण कार्यालय, धाराशिवच्या डॉ. अश्विनी गोरे व डॉ. प्रितम तुकाराम राऊत, वय ४८ वर्षे, (आरोपी क्र. १ यांचे पती) पद – वैद्यकीय अधिकारी, अस्थीरोग तज्ञ, (वर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, धाराशिव, जि. धाराशिव/ दोघे रा. क्वॉटर्स क्र.3, क्लास 1 क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव हे लाचेच्या जाळ्यात अडकले.

यातील तक्रारदार यांचे डॉक्टर लेन, नांदेड येथे अर्पण रक्तकेंद्र (रक्तपेढी) आहे. दि. ७ मार्च रोजी यातील आरोपी डॉ. अश्विनी गोरे यांनी दुपारी एक वाजण्याचे सुमारास त्यांचे रक्त केंद्राला (रक्तपेढी) भेट देवून रक्तपेढीची तपासणी केली. रक्त केंद्राची (रक्तपेढी) तपासणी झाल्यानंतर जातेवेळी दुपारी साडे चार वाजण्याचे सुमारास त्या तक्रारदार यांना म्हणाल्या की, रक्त केंद्राच्या (रक्तपेढी) तपासणीत त्रुटी आहेत, त्या त्रुटी रेकॉर्डवर न येऊ देण्यासाठी ०१ लाख १० हजार द्यावे लागतील. नाही तर तुमचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना आता सध्या पैसे नाहीत असे सांगितले. त्यावर आरोपी क्र. १ यांनी आता जेवढे आहेत तेवढे द्या असे सांगितले. डॉ. अश्विनी गोरे यांना मागितलेली रक्कम नाही दिली तर ते तक्रारदार यांचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) बंद करण्याची कारवाई करतील या भितीने तक्रारदार यांनी आधी त्यांना १० हजार दिले. त्यानंतर आरोपी क्र. १ यांनी उर्वरित ०१ लाख दि. ८ मार्च रोजी द्या, ते पैसे घेण्यासाठी मी माणूस पाठविते असे त्यांनी तक्रारदार यांना सांगितले.

सदरची ०१ लाख रुपये लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवार दि. ८ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी आरोपी डॉ. अश्विनी गोरे यांचे मोबाईलवर पंचासमक्ष कॉल लावला असता, डॉ. अश्विनी गोरे यांनी कॉल उचलला नाही. लगेच तक्रारदार यांना एक कॉल आला व त्याने सांगितले की, मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी तुम्हाला भेटण्यास सांगितले आहे, तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर या असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांना पंचासह पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर पडताळणीसाठी पाठविले असता, त्याठिकाणी एक इसम आला व त्याने मला डॉ. अश्विनी गोरे यांनी पाठविले आहे असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी डॉ. अश्विनी गोरे यांना खात्री करण्यासाठी पंचासमक्ष मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी तक्रारदार यांना डॉ. अश्विनी गोरे यांनी तेथे श्री. माळी हे आलेले आहेत, पैसे आणले का, किती आणले, त्यांना द्या, असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी ५० हजार रुपये आणलेले आहेत असे सांगितले असता, आरोपी डॉ. अश्विनी गोरे यांनी तुम्ही दिलेला शब्द पाळा, ठरल्याप्रमाणे द्या असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी आज सुट्टीचा दिवस आहे. पैसे जमवाजमव करायला वेळ लागेल असे सांगितल्यानंतर डॉ. अश्विनी गोरे यांनी ठिक आहे, माझे माणसाकडे द्या असे म्हणून फोन कट केला.

तक्रारदार यांनी आरोपी क्र.२ डॉ. प्रितम राऊत यांना पैसे घेवून येतो असे म्हणून परत आले. त्यानंतर तक्रारदार यांनी डॉ. प्रितम राऊत यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर पंचासमक्ष भेट घेतली असता. डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष सदरची लाच रक्कम रू. ५० हजार रुपये स्विकारली. तक्रारदार यांनी तात्काळ इशारा दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडच्या पथकाने डॉ. प्रितम राऊत यांना रंगेहाथ पकडले.

आरोपी डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे. वजिराबाद, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन बोडके, पोना राजेश राठोड, पोकॉ स.खदीर, पोकॉ बालाजी मेकाले, पोकॉ अरशद खान, चापोना प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने केली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!