Saturday, June 22, 2024

मुखेडजवळ एसटी बस व ट्रक कंटेनरचा भीषण अपघात, ९ प्रवासी जखमी; बसच्या समोरील भागाचा चुराडा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुखेड (जि. नांदेड) – मुखेड शहरापासुन ४ किलोमीटरच्या अंतरावरील लातूर राज्यमार्ग रस्त्यावरील शिरूर दबडे पाटीच्या वळणावर मुखेड आगाराची एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात झाला. आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघातात एसटी बसमधील चालकासह नऊ जण जखमी झाले असून त्यात दोन अतीगंभीर जखमी झाले आहेत.

मुखेड आगाराची बस क्रमांक एम एच २० बी एल २२२८ हे मुखेड कडे येत होती तर लातूरच्या दिशेने ट्रककंटेनर क्रमांक जी. जे. ०५ बी एक्स ७६४२ हे जात असताना मुखेड होऊन चार किलोमीटरच्या अंतरावरील लातूर राज्य महामार्गावरील शिरूर दबडे पाटीच्या वळणावर दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसच्या केबिनसह समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

एसटी बस मधील  बालाजी गणपतराव हाके वय ४० वर्ष रा. मुखेड, रामदास संभाजी कबीर वय ४० वर्षे रा. शिकारा,  मीरा नागोराव पांढरे वय ३६ वर्ष रा. मुखेड, देविदास राठोड वय ६५ रा. सकनुर, प्रल्हाद रामराव इंगळे वय ३२ रा शिकारा,  रघुनाथ संग्राम मस्कले वय ५० वर्ष रा. मुखेड, संग्राम मारुती मुंडे वय ४५ वर्ष रा. सावरगाव वाडी, पुष्पा देविदास बनसोडे वय ५१ वर्ष रा. मुखेड, विष्णुकांत राजाराम कोतापल्ले वय ३० रा. मुखेड, यांना उपचार करण्यासाठी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यात दोन जण गंभीर जखमी असल्याने प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

या अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर तहाडे, डॉक्टर नरेंद्र गादेकर यांनी उपचार केले दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन आगारप्रमुख रा.सू बोधे, सुशील पत्की, बजरंग कल्याणी, भगवान रोडगे ,बालाजी नगरे, उपसरपंच शिवाजी राठोड ,अँड. हाके,बालाजी शिंदे बिल्लाळीकर ,विठ्ठलराव घोगरे प्रताप कोल्हे नागेश लोखंडे, उल्हास ईमडे यांनी जखमींंना मदत केली.दरम्यान ही घटना घडताच मद्यप्राशन केलेल्या कंटेनर चालक फरार झाला होता. अपघाताच्या ठिकाणी मुखेडचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी बंदोबस्त लावून वाहतूक सुरळीत केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!