Sunday, October 6, 2024

एसबीआय बँकेसमोर कारची काच फोडून पैशाची बॅग पळविली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ कंत्राटदार गोविंद देशमुख यांची एक लाखाची बॅग लंपास

◆ नवीन मोंढा एसबीआय बँकेसमोरील घटना

नांदेड– अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील कंत्राटदार गोविंद रामराव देशमुख यांच्या गाडीचा काच फोडून एक लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना नवीन मोंढा येथील एसबीआय बँकेचे समोर सोमवारी दिनांक 31 जानेवारीच्या सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

गोविंद देशमुख यांनी कामगारांचे पगार करण्यासाठी एक लाख रुपये बँकेतून काढले होते. एक लाख रुपयेची बॅग समोरच्या सीटवर ठेवली होती. त्यानंतर काही कामानिमित्त ते खाली उतरले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी काच फोडून एक लाख रुपयेची बॅग लंपास केली. घटनास्थळाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस फौजदार भूषण कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस कर्मचारी श्री मोरे, संजय केंद्रे, यांनी भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!