Tuesday, March 28, 2023

कमरेला गावठी पिस्तुल लावून फिरणाऱ्या अहमदपूरच्या आरेफला नांदेडमध्ये अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- कमरेला गावठी पिस्तुल लावून फिरणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या आरेफ नामक युवकाला नांदेडमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीतांची माहीती काढुन त्यांच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याबाबतच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार सुरू असलेल्या कारवाईत स्थागुशाच्या पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व तिनं जिवंत काडतूस जप्त केले.

शुक्रवार दिनांक तिनं फेब्रुवारी रोजी व्दारकादास चिखलीकर यांना शहरातील माळटेकडी जाणाऱ्या रोडवरील पुलाखाली येथे एक व्यक्ती स्वतः जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार याना आंबिका मंगल कार्यालयाचे पाठीमागे येथे रवाना केले. स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांनी माळटेकडी जाणारे रोडवरील पुलाखाली नांदेड येथे जावुन आरोपी आरेफ अनवर शेख (वय 19 रा. मेनकुदळे गल्ली, अहमदपुर ता. अहमदपुर जि. लातुर ) यांना पकडून त्यांची झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला लावलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल व तिन जिवंत काडतुस किंमती 36 हजार 800 रुपयाचे मिळून आल्याने ते जप्त करुन नमुद आरोपीविरुध्द सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी फिर्याद दिली असून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, डॉ. खंडेराव धरणे, व्दारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, पोकॉ  तानाजी येळगे, पोकॉ देवा चव्हाण पो कॉ मोतीराम पवार, रणधीर राजवन्सी, महेश बडगु, चापोकॉ हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,753FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!