ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई/ नांदेड – काँग्रेसकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 16 उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. यात नांदेड जिल्ह्यात मुखेडमध्ये माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, देगलूरमधून निवृत्तीराव कांबळे तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आ. मोहनराव हंबर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि.26) रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर केली आहे. आज सकाळीच काँग्रेसने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या तिसऱ्या यादीत 16 जणांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसकडून विधानसभेसाठी नांदेड दक्षिणमधून पुन्हा आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झाली तर मुखेड मतदासंघातून माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना संधी देण्यात आली आहे. देगलूर मधून निवृत्ती कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली. यापूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रस पक्षाची तिसरी उमेदवार यादी
- राणा सानंदा – खामगाव
- 2. हेमंत चिमोटे – मेळघाट
- 3.मनोहर पोरेटी – गडचिरोली
- 4. दिग्रस – माणिकराव ठाकरे
- 5. नांदेड दक्षिण – मनोहर अंबाडे
- 6.देगलूर – निवृत्तीराव कांबळे
- 7. मुखेड – हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
- 8.एजाज बेग – मालेगाव मध्य
- 9. शिरीष कुमार कोतवाल – चांदवड
- 10. लकीभाऊ जाधव – इगतपुरी
- 11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे
- 12. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
- 13. वांद्रे पश्चिम – असिफ झकारीया
- 14. तुळजापूर – कुलदीप पाटील
- 15. कोल्हापूर दक्षिण – राजेश लाटकर
- 16. सांगली – पृथ्वीराज पाटील
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
