Wednesday, March 19, 2025

काँग्रेसची पहिली यादी जाहीर; ‘लक्षवेधी’ भोकरमधून कोंढेकर, नायगावमधून मीनल खतगावकर तर हदगावमधून आ. जवळगावकरांना उमेदवारी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई/ नांदेड – महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात नांदेड जिल्ह्यातून ‘लक्षवेधी’ असलेल्या भोकरमधून तिरुपती कदम कोंढेकर, नायगावमधून मीनल पाटील खतगावकर तर हदगावमधून आमदार माधवराव पाटील जवळगावकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती. आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये ४८ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे.

काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवार आणि मतदार संघ पुढीलप्रमाणे –


1. अक्कलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)

3.नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – प्रवीणबापू चौरे (ST)
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तिवसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19. नागपूर उत्तर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत (SC)
20. साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21. गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22. राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23. ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24. चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25. हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26. भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27. नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28. पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29. फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30. मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31. मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32. चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33. धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34. मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35. पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36. भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37. कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38. संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39. शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40. लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
41. लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42. अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!