Tuesday, October 15, 2024

काँग्रेसला मोठा हादरा: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस सोडली, प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻


मुंबई/ नांदेड: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस सोडली आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आपल्या आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशोक चव्हाण यांचे समर्थक असणाऱ्या नांदेडच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘भावी खासदार’ असा उल्लेख असलेले अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत. अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा आणि एकूणच राज्यभरातील अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अशोक चव्हाण नॉट रिचेबल
अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. ते आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही काळात सुरू असलेल्या गुप्त बैठकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा त्यावेळी होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश होता, हे विशेष. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याने महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आणखी जास्त अडचणीत आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!