Sunday, May 19, 2024

काँग्रेस आमदारांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हदगाव (जिल्हा नांदेड)- हदगाव – हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधवराव जळगावकर यांच्या हदगावस्थित निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून त्यांच्या घरामध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी श्वान पथकासह भेट देऊन पाहणी केली.

आमदार माधवराव जळगावकर हे आपल्या कुटुंबीयांसह नांदेडच्या हनुमान गड परिसरात राहतात. आपल्या मतदारसंघातील विविध कामांसाठी त्यांचे हदगाव येथे निवासस्थानाखाली संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये मतदारसंघातील दिव्यांगाना वाटप करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल आणले होते. जवळपास 200 हून अधिक मोबाईल त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयातील किचन रूममध्ये ठेवले होते. परंतु अज्ञात चोरट्यांनी शनिवारी दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्य दार तोडून किचन रूमचा दरवाजा उघडला. किचन रूममध्ये ठेवलेले मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.

ही घटना रविवार दि. २१ आगस्ट रोजी सकाळी समजताच आमदार जळगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. याबाबत माजी नगराध्यक्ष अमित अडसूळ व काही नगरसेवकांनी हदगाव पोलिसांना कळविले. आमदार जवळगावकर सध्या मुंबईमध्ये असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पोलीस श्वान पथकालाही पाचरण करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही आमदार जवळगावकर यांच्या निवासस्थानाला भेट दिल्याचे समजते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी आमदार जवळगावकर यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!