ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर– तत्कालीन लातूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.आर. देशमुख (काका) यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगावर उपचार सुरू होते.
लातूरच्या राजकारणात, समाजकारणात एस.आर.देशमुख यांची वेगळी छाप होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे ते विश्वासू सहकारी होते. अतिशय मनमिळावू, अनेकांना हवे हवेसे वाटणारे एस.आर. देशमुख हे एस.आर.काका या नावाने ओळखले जात होते. लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सामाजिक कार्यासाठी सतत झटणारे ते व्यक्तिमत्व होते. आज रविवार ५ जून रोजी पहाटे ०४.३० वा. पुणे येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ.धीरज देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्यासह अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
दिवंगत एस.आर.देशमुख यांच्या पश्चात ४ भाऊ, ३ मुली, १ मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी ०६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर येथील मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻