Monday, October 14, 2024

कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या दोन मजुरांना भरधाव टिप्परने चिरडले; दोन ठार, एक जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड: कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या उत्तरप्रदेशातील काही मजुरांना भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन मजूर ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे.

काल दि. २३ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विष्णूपुरी जवळ हा अपघात घडला. उत्तर प्रदेशातील तीन मजूर काम शोधण्यासाठी तीन ते चार दिवसांपूर्वीच नांदेड येथे आले होते. ते कामाच्या शोधात नांदेड शहर व परिसरातच फिरत होते. काल रात्री बाराच्या सुमारास ते असर्जनकडून विष्णूपुरीकडे पायी जात होते. याचवेळी लातूर फाटा येथून वाडी पाटीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या (एमएच- ४०, वाय-३५७७) टिप्परने या तीन मजुरांना उडवल्याचे सांगण्यात येते. यात शिवकुमार राजभर (वय-४२ वर्षे, रा. अमहरा ता. रसडा, जि. बलीया) व मनोजकुमार मनता (वय-३०, रा. शिवराबहादूरगंज ता. काशिमाबाद, जि. गाजीपुर) अशी मृतांची नावे आहेत. तर भरत जयनारायण राजभर (वय- २८, रा. राजापूर, ता. मोहम्मदाबाद जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश) हा मजूर या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. महेश कोरे तसेच पोलीस नाईक सुनील गटलेवार हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!