Tuesday, May 21, 2024

कारला भीषण अपघात; नांदेडच्या सिडको भागातील तीन जण ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लोहा- पालम रस्त्यावर भीषण अपघात

नांदेड– भरधाव वेगात जाणाऱ्या एक कार आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण ठार झाले आहेत. हे तीनही जण नांदेडच्या सिडको भागातील रहिवाशी आहेत. ही घटना लोहा पालम रस्त्यावरील पेठशिवणीजवळ आज रविवार, दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. घटनास्थळाला पालम पोलिसांनी भेट दिली असून अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता.

नांदेड येथील सिडको परिसरात राहणारे कुटुंब कार क्रमांक (एमएच०२७ ३४) हे लोहाकडे येत होते. यावेळी लोहा कडून (एमएच२२- 63 33) क्रमांकाची क्रुझर कार हे पालमकडे जात होती. ही दोन्ही वाहने पेठशिवणीजवळ समोरासमोर एकमेकांवर अत्यंत जोरदारपणे धडकली. यात कारमधील तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळाला पालमचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे, फौजदार विनोद साने यांच्यासह आदींनी भेट दिली. जखमींना पालम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच नांदेडमधून अनेक जण घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तिन्ही मयत हे सिडको भागातील असून या अपघाताचे वृत्त कळल्यानंतर येथे शोककळा पसरली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!