ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
◆ नांदेड- भोकर महामार्गावर भीषण अपघात
नांदेड– भोकर महामार्गावर कार आणि ट्रॉलीच्या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. काल रात्री या महामार्गावरील खरबी शिवारात हा अपघात झाला.
काल रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास भोकर येथील रहिवासी असणाऱ्या एका पोलीस मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम उरकुन चार पोलीस कर्मचारी भोकरहून नांदेडकडे परत येत होते. याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची कार भोकर- नांदेड महामार्गावरील खरबी (ता. भोकर) शिवारातील रस्त्यावर ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून अत्यंत जोरदारपणे धडकली. या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले असून दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेड पोलीस मुख्यालयात कंट्रोल रुम येथे नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी दीपक देवानंद जाधव (ब.नं. 3374) व नांदेड पोलीस मुख्यालयात येथे नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी ईश्वर सुदाम राठोड (ब.नं. 2727) (दोघे मयत ) आणि जखमी पोलीस कर्मचारी प्रितेश ईटगाळकर (ब.न..2853), सदानंद सपकाळ (ब.नं.234) हे चार पोलीस कर्मचारी आणि त्यांचे भोकर येथील रहिवासी असणारे पोलीस कर्मचारी मित्र सुनिल सांभाळकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रमासाठी गेले होते.
इंडिका कार नंबर MH-26-V-1868 ने ते भोकरवरुन नांदेडकडे परत येत असताना भोकर ते नांदेड रोडवरील खरबी शिवारात रस्त्याने जाणाऱ्या उसाचा ट्रॅक्टर नंबर MH-26-AR-1156 या ट्रॉलीला पाठीमागुन अत्यंत जोरदारपणे धडकले. यात ईश्वर सुदाम राठोड व दीपक देवानंद जाधव हे दोघे पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. तर सदानंद सपकाळ व प्रितेश ईटगाळकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे मृतदेह पुढील कारवाईसाठी भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आली आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)