Tuesday, October 15, 2024

काल आमदार जितेश अंतापूरकरांचे तर आज चक्क अशोक चव्हाण यांचे मतदान हुकले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर गेले शिंदे गटात

मुंबई/ नांदेड- विधानसभेत काल अध्यक्ष निवडीवेळी देगलूर- बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांचे मतदान हुकले होते. त्यानंतर आज बहुमत चाचणीवेळी चक्क माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण यांचेच मतदान हुकल्याचा प्रकार घडला.

विधानसभेत काल अध्यक्ष निवडीवेळी आणि आज बहुमत चाचणीवेळी नांदेड जिल्ह्यातील आमदारांशी संबंधित काही लक्षवेधी घडामोडी घडल्या. काल जितेश अंतापूरकर यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. त्यानंतर आज चक्क अशोक चव्हाण यांना मतदान प्रक्रियेपासून दूर राहावे लागले. आज शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे वेळेत विधानभवनात पोहचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना बहुमत चाचणीच्या मतदानास उपस्थित राहता आले नाही.

आज विधानसभेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. बहुमत चाचणीस प्रारंभ झाला आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर मतविभागाची मागणी करण्यात आली. मतदानास सुरवात होऊन विधानसभेच्या कामकाजास सुरुवात झाली.

पण तोपर्यंत अशोक चव्हाण हे विधानसभेतील सभागृहाच्या दारावर पोहोचले नाही. ते दारावर उशीरा आले,  तोपर्यंत सभागृहाचे दार बंद झाले होते, त्यामुळे त्यांना बहुमत चाचणीस सभागृहात उपस्थित राहता आले नाही.

विधानसभेत काल अध्यक्ष निवडीवेळी देगलूर- बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी मतदान केले नाही. नेमके कालच ते बोहल्यावर चढले असल्याने त्यांना ते मुंबईत येऊ शकले नाहीत. पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन त्यांनी विधानसभा अधिवेशनाला दांडी मारत लग्न उरकून घेतल्याचे सांगण्यात येते.

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर गेले शिंदे गटात

नांदेड जिल्ह्याशेजारील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी काल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे अर्थात मविआ उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, आज अचानक त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आपली बाजू बदलली आणि ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!