ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ ना. अशोक चव्हाण यांनी दिली माहिती
नांदेड– शहराजवळील काळेश्वर मंदिर आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या बॅकवॉटर परिसरात १२.२५ कोटी रुपये खर्चून बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्क उभारले जाणार आहे. या १२.२५ कोटींपैकी ४.६३ कोटी निधीला मंजुरी आज मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
काळेश्वर मंदिर, नांदेड नजिक विष्णुपुरी प्रकल्पामध्ये बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्कला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकूण १२.२५ कोटींच्या या प्रकल्पासाठी तूर्तास ४.६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे नांदेडच्या सौंदर्यात भर पडेल व पर्यटनालाही चालना मिळेल, अशी खात्री ना. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या परिसरातील बोटींग क्लब ॲडव्हेंचर पार्क व इतर सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 12.25 कोटींच्या कामांना त्यांनी मान्यता दिली असून तसे प्रशासकीय आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी काढले आहेत. या 12.25 कोटी पैकी 4.62 कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करुन दिला आहे.
याच परिसरात मुंबईतील सी-लिंकच्या धर्तीवर उड्डाण पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच ना. चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर आता बोटिंग क्लब व ॲडव्हेंचर पार्क उभारणीची घोषणा त्यांनी केली असून यामुळे या परिसराचे रूपच पूर्णतः पालटणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻