Friday, December 6, 2024

किनवटजवळ नंदीग्राम एक्स्प्रेसखाली बकऱ्यांचा कळप चिरडला; तब्बल 22 बकऱ्या मृत्युमुखी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट (जि. नांदेड)– आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसखाली सापडून २२ बकऱ्यांचा कळप चिरडल्या गेल्याची दुर्दैवी घटना किनवट- सिरमेट्टी लोहमार्गावर सोमवारी दि.१८ दुपारी घडली. यात तब्बल 22 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

किनवटपासून ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या सिरमेट्टी गावातील पाचपुते नामक शेतकऱ्याच्या २७ बकऱ्यांचा कळप सोमवारी सकाळपासून सिरमेट्टी शिवारात चरत होता. शिवारात चरणारा कळप चरत चरत रेल्वेपटरीवर आला. याचदरम्यान आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस किनवटकडे येत होती. रेल्वेगाडी सिरमेट्टी गावाजवळ येताच चालकाला पटरीवर बकऱ्यांचा कळप असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत इंजिनचे इमर्जन्सी ब्रेकही लावले. परंतु, तोवर बकऱ्यांचा कळप रेल्वेगाडीखाली सापडला.

या दुर्दैवी अपघातात २७ पैकी १० बकऱ्या जागीच मरण पावल्या. तर १२ बकऱ्या गंभीर जखमी होऊन गतप्राण झाल्या. मात्र सुदैवाने ५ बकऱ्या बचावल्या असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेगार्डचा हवाला देत किनवटचे स्टेशनमास्तर  मीना यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. बकऱ्यांचा कळप चिरडल्याची घटना कळताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले. आधीच अतिवृष्टीमुळे हैराण असलेल्या शेतकरी पाचपुते यांच्या बकऱ्यांचा कळप रेल्वेखाली सापडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!