Friday, July 19, 2024

किनवट- हिमायतनगर तालुक्यात पूर, नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार, जनजीवन विस्कळीत; जायकवाडीचे पाणी नांदेडमध्ये, विष्णुपुरीचे दोन दरवाजे उघडले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नागरिकांना अतिवृष्टी काळात प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

नांदेड– जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवार दिनांक 26 जुलै रोजी जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. हिमायतनगर आणि किनवट तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. या तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेले असून रस्ते व पुलांची अवस्थाही अतिशय बिकट झाली आहे. अनेक मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे, तसेच अर्धापूर, भोकर, हदगाव, कंधार तालुक्यातही जोरदार पाऊस पडत आहे.

नांदेड शहरातही व परिसरातही जोरदार पाऊस पडत आहे. अजूनही जिल्ह्यावर ढगाळ वातावरण असून परत दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचून अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हिंगोली गेट अंडरब्रीज आणि लालवाडी अंडर ब्रिज हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. शहरातील काही रस्त्यांचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतुकीचा पुरता खोळंबा आवडत आहे. रस्तेही चिखल मिश्रित निसरडे झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

सततच्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९१.९९% झाल्याने जायकवाडी धरणाची एकूण १८ दरवाजे अर्ध्या फुटावरुन वर उचलून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सलग चौथ्या वर्षी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. सध्या धरणाच्या हायड्रो मधून १५८९ तर सांडव्यातून १८,८६४ क्युसेक या वेगाने नदी पात्रात २० हजार ४५३ पाणी विसर्ग केला जात आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक क्षमतेने पाणी विसर्ग सुरू आहे. अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी प्रशांत जाधव यांनी दिली. सतर्कता म्हणून नांदेड जिल्हा प्रशासनाने विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले आहेत. मंगळवार दि. २६ जूलै सायंकाळपर्यंत जायकवाडीचे पाणी विष्णुपुरीत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जून दिवसांपासून कमी अधीक प्रमाणात पाणलोट क्षेत्रातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातील येत आसलेली पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी ९९.९९% टक्क्यांच्या वर पोहचली असुन सध्या जलाशयात २८ हजार क्युसेक या गतीने नविन पाणी दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी हळूहळू वाढत जात विसर्ग २० हजार ४५३ आहे वाढत्या पाणी पातळीमुळे जायकवाडी धरणाने ९९.९९% ओलांडली असून औरंगाबाद शहरासह, शेतकरी वर्गाला व नदी काठच्या गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग चौथ्या वर्षी धरणाचे दरवाजे उघडले आहेत. जायकवाडी धरणाचे आठरा दरवाजे अर्ध्या फुटावरून एक फुट वर उचलेले. गोदावरी नदी पात्रात पाण्याचा जायकवाडी धरणात ९१.९९ टक्के पाणीसाठा दलघमी आहे. तर धरणाच्या पाण्याची आवक २८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात २८ हजार क्युसेकने पाणी दाखल पाणी पातळी १५२०.५३ फुटामध्ये तर ४६३.४५८ मीटर मध्ये धरणाचा एकूण पाणी साठा २७३५.२६२ दलघमी असून जिवंत पाणी साठा १९९७.२५६ पाण्याची टक्केवारी ९१.९९% इतकी आहे.

जायकवाडीचे पाणी नांदेडकडे झेपावल्याने विष्णुपुरी प्रकल्पात अगोदरच पाण्याचा येवा असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागरिकांना अतिवृष्टी काळात प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्ते व पुलावरुन पाणी वाहत आहे. रस्त्यावरुन व पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणाहून वाहतूक करु नये. अशा वेळेस वाहतूक केल्यास व्यक्तीची जिवीतीहानी तसेच त्यांच्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे नागरिकांनी खबरदारी घेवून प्रवास करावा व अनावश्यक रस्ते अपघात टाळावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!