Saturday, July 27, 2024

किरकोळ वादातून विद्यार्थ्यांनी शाळेत मोटारसायकली पेटविल्या, अनेक दुचाकींची तोडफोड; शिक्षक- पालकांना मारहाण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ सहस्त्रकुंड येथील एकलव्य रेसिडेन्शियल शाळेतील धक्कादायक प्रकार

इस्लापूर (ता. किनवट)- एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन याचे रूपांतर  हाणामारीत झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेतील दोन दुचाकी पेटविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात दोन्ही दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत, तर तीन दुचाकींची तोडफोड केली.

ही घटना नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल इंग्लिश स्कूलमध्ये आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल इंग्लिश स्कूल आहे. या शाळेतील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे पैसे चोरीला गेल्याने अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी रात्रीला सहावी पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

या मारहाणीची बातमी पालकांपर्यंत पोहोचल्याने पालक मुलांना भेटण्यासाठी गेले असता येथील दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी पालकांना देखील मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर येथील शिक्षकांना देखील मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्यांना इस्लापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती इस्लापुर पोलिसांना मिळताच इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी पोलीस  कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणुन मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

या गंभीर घटनेची दखल घेऊन  किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी या शाळेला भेट देऊन विद्यार्थी व पालक यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण काही पालकांनी  संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी केल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी संबंधितांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे या पालकांना यावेळी आश्वासन दिले.

या घटनेची माहिती किनवट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनीसुद्धा या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. जनाबाई डूडूळे, पंचायत समिती सदस्य अनिता सुभाष वानोळे, डॉक्टर सुभाष वानोळे, कॉम्रेड शेषराव ढोले, आदिवासी नेते गंगाराम गड्डमवाड, दत्ता लोखंडे ,माधव कराळे यांच्यासह अनेक आदिवासी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!