Thursday, September 21, 2023

किरीट सोमय्यांविरुद्ध नांदेडमध्येही शिवसेना रस्त्यावर, प्रतिकात्मक पुतळा जाळला; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– आयएनएस विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे अशी मागणी करीत आज नांदेडमध्येही शिवसेना रस्त्यावर उतरली. आज गुरुवार दि. सात एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा शिवसेनेच्यावतीने शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करीत सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नांदेड येथे शिवसेनेच्यावतीने महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, खासदार हेमंत पाटील आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, लोकसभा संघटक डॉ. मनोजराज भंडारी, शिवसेना जिल्हासंघटक दयाल गिरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश मोरे, गंगाधर बडुरे, शिवसेना महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, सचिन किसवे, गजानन राजुरवार, माधव बिल्लेवाड, शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे, जयवंत कदम, अमोल पवार, सुरेश पाटील हिलाल, परमेश्वर जाधव, संजय पाटील कुरे, संतोष कपाटे, युवासेना सहसचिव माधव पावडे, शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, युवासेना जिल्हा युवाधिकारी व्यंकटेश मामिलवाड, गजानन कदम, जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पावडे, बाबुराव वाघ, शिवसेना तालुकासंघटक नवनाथ काकडे, बालाजी भायेगावकर, महिला आघाडीच्या निकिता शाहापुरवाड, दिपाली उदावंत, साहेबराव मामिलवाड, बळवंत तेलंग, स.दर्शनसिंघ सिध्दु, रमेश पाटील कोकाटे, प्रकाश जोंधळे, श्याम पाटील वानखेडे, श्याम बन, प्रणव बोडके, दिगंबर कल्याणकर, आनंद जाधव, शैलेश राऊत, गौरव कोटगिरे, उमेश दिघे, पिंटू सुनपे, साई विभुते, सचिन कल्याणकर, दिगंबर बाबर, धनंजय पावडे, कैलास कल्याणकर, मुन्ना राठौर, राजू मोरे, राजू गुंडावार, कोरचन यादव, नितिन सरोदे, गजानन हारकरे, स. नवजितसिंघ गाडीवाले, अशोक पावडे, गंगाधर कोकाटे, आकाश कोकाटे, बाळु शिंदे, गजानन पवार, विठ्ठल कुंडे, रवी कोकाटे, साहेबराव वानखेडे, बंडू पेंटर, मनमत स्वामी यांच्यासह आदी शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!