Thursday, April 25, 2024

किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांत राडा; झटापटीत सोमय्या पायऱ्यांवर कोसळले, रुग्णालयात दाखल; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलही भेटीसाठी रुग्णालयात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पुणे- येथील महानगरपालिकेत भाजप नते किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांत राडा झाला. पुणे महापालिकेत पायऱ्यांवरच झालेल्या या राड्यात झालेल्या झटापटीत सोमय्या पायऱ्यांवर कोसळले. त्यांना पुणे येथील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सोमय्या यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आहेत. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषदही घेणार होते. मात्र ते महानगरपालिकेत येताच मोठा राडा झाला. किरीट सोमय्या महापालिकेत पोहचताच तिथे आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

नंतर किरीट सोमय्यांची गाडी अडवली. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या कारसमोर येत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी सोमय्या आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, या झटापटीत किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर खाली पडले. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पायऱ्यांवरून उठवून कसेबसे गाडीत बसवले. यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता. शिवसैनिकांनी नंतर सोमय्या यांच्या गाडीलाही घेरले आणि किरीट सोमय्याच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला सारत गाडी महानगरपालिकेतून बाहेर काढली.

त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. किरीट सोमय्या यांना मानसिक धक्का बसलेला आहे. तसेच त्यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा रक्तदाब अचानक वाढला होता. महानगरपालिकेच्या पायर्‍यांवर ते पडले होते. ते पाठीवर पडले आणि त्यामुळे त्यांनी उजव्या हाताचा आधार घेतला होता. या उजव्या हाताला मुका मार लागलेला आहे. त्यांना एक दिवस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात येणार आहे,” अशी माहिती डॉ. पराग संचेती यांनी माध्यमांना दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!