Saturday, November 9, 2024

कीर्ती उद्योग समूहाचे संस्थापक विष्णुदास भुतडा यांचे निधन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर- येथील कीर्ती उद्योग समूहाचे संस्थापक विष्णुदास भुतडा (वय 92) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता लातूरमध्ये निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 11 वाजता मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विष्णुदास भुतडा यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कीर्ती उद्योग समूहाची उभारणी केली. उद्योग क्षेत्रात त्यांनी गगनभरारी घेत तेलाची निर्मिती आणि विक्री क्षेत्रात कीर्ती उद्योगाचे एक वेगळे स्थान निर्माण केले. कीर्ती समूहाचे लातूमध्ये मुख्यालय असून लातूरसह सोलापूर, नांदेड जिल्ह्यामध्येही युनिट असून विक्री व्यवसाय सर्वत्र पसरलेला आहे.

त्यांच्या पश्चात चार मुले सतीश, अशोक, कीर्ती, भारत व एक मुलगी मीना, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. विष्णुदास भुतडा यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील एक मोठा दिग्गज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!