ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
बिलोली (जि. नांदेड)- सुनेने जेवणानंतर ताट उचलले नसल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना बिलोली तालुक्यातील कासराळी येथे घडली आहे. ही घटना काल दि.२९ सप्टेंबर रोजी राञी घडली. या प्रकरणी बिलोली पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली आहे.
कासराळी येथील लालू पिराजी इंगळे हे राञी साडे आठ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी जेवण केले. जेवणानंतर सुनेने लगेच ताट उचलले नसल्याच्या कारणावरून त्यांचा सुनेसह मुलासोबत वाद सुरू झाला. या वादातुन मुलगा प्रकाश लालू इंगळे याने घरातील कुऱ्हाडीने पित्याच्या डाव्या पायावर आणि इतरत्र वार केले. यात लालू पिराजी इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणाची माहिती मिळताच बिलोली पोलिस स्टेशनचे पो.नि.डोईफोडे,ए.पी.आय केंद्रे,किरण कणसे, बिट जमादार गोविंद शिंदे, बिलोली बिटचे मुद्दमवार आदींनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारार्थ बिलोली येथे पाठवून घटना स्थळाचा पंचनामा करत लालू कांबळे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवले. या प्रकरणी मयताची पत्नी पार्वती लालू इंगळे वय ५५ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा प्रकाश लालू इंगळे यांच्या विरूध्द कलम ३०२ अन्वये बिलोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास बिलोली पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक रामदास केंद्रे हे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻