ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहराच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना बेकायदेशीररित्या चालणाऱ्या कॉफी शॉपवर पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी चार तरुणी आणि आठ तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हे सर्वजण याठिकाणी अश्लील वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी आठ युवकांसह कॉफी शॉप मालकांविरुद्धही विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर या दोन्ही कॉफी शॉप मालकांना पोलिसांनी तंबी दिली आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथील राज माल आणि टिळकनगर येथील कासलेवाल कॉम्प्लेक्समधील या दोन कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाई केली. राज मालमधील कॉफी कॉर्नर आणि कासलीवाल कॉम्प्लेक्समधील फूड जंक्शन कॉफी शॉप येथे तरुण- तरुणी अश्लील चाळे करत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांना मिळाली. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख (शहर) यांच्या आदेशावरून काकडे यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी कारवाई केली.
या कारवाईमध्ये चार तरुणी आणि आठ तरुण अश्लील वर्तन करताना आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन विमानतळ पोलिस ठाण्यात हजर केले. मुलींना समज देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले तर मुलांविरुद्ध आणि दोन्ही कॉफी शॉप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी कॉफी शॉप चालकांनी काळजी घ्यावी, तसेच आपल्या कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही आणि बसण्याची व्यवस्था ओपन असावी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी तंबी श्री काकडे यांनी दिली.
दामिनी पथक कुठेय?
विमानतळ पोलीस ठाण्यासह अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कॉफी शॉपचे पेव पुन्हा सुरू झाले आहे. अल्पवयीन मुलींना किंवा बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून काही रोड रोमिओ या कॉफी शॉपचा आधार घेत आहेत. खरे तर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे. मात्र ते मागील काही दिवसापासून नेमकं कुठं गेलं हे समजण्यापलीकडे आहे. दामिनी पथकांकडून यापूर्वीच्या काळात कारवाया झाल्या होत्या. परंतु सध्या पोलीस निरीक्षकांनाच आपल्या हद्दीत अशा ठिकाणी कारवाया करीत आहेत. दामिनी पथकाला सक्रिय करून यासाठी कायम अधिकारी व मुबलक मनुष्यबळ देऊन शहरातील अशा कॉफी शॉप चालकाविरुद्ध कारवाया कराव्यात अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻