Sunday, June 4, 2023

कोचिंग क्लासेसवाल्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैशी; प्रशासनाचे आदेशही जुमानेनात, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ शहरातील कथित नावाजलेल्या कोचिंग क्लासेस चालकांसह अनेकांना दंड

नांदेड– शहरात कोचिंग क्लासेसवाल्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैशी करण्यात येत आहे. पैशाच्या जोरावर काहीही करण्याची तयारी असणारे हे कोचिंग क्लाससेसवाले आता प्रशासनाचे आदेशही जुमानायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. शेकडो विद्यार्थ्यांकडून मिळणारी करोडो रुपयांची फी वसुली बुडू नये, यासाठी काही कोचिंग क्लासेसचे चालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासही मागे पुढे पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र नांदेडमध्ये दिसून आले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही हे सारे काही करीत असल्याचा आव आणून या क्लासेस चालकांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील स्वयंघोषित टॉपर असणाऱ्या कोचिंग क्लासेस चालकांचाही यात समावेश आहे.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यासाठी नवीन कोरोना नियमावली जाहीर केली असून गुरुवारी दि. 13 जानेवारी रोजी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या आदेशाने शहरातील आर.सी.सी कोचींग क्लासेसला  50 हजार, सलघरे कोचींग क्लासेसला 10 हजार यासह इतरही काही कोचिंग क्लासेस चालकांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे रु.95 हजार ( पंच्यानव हजार) दंड वसुल करण्यात आला.

आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरिष कदम यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधु क्षेत्रीय अधिकारी एक ते सहाचे संजय जाधव, डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग, रमेश चवरे, डॉ. रईसोद्दीन, रावण सोनसळे, अनिवाश अटकोरे व सहा. आयुक्त सुधीर इंगोले यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग नोंदविला.

महापालकेच्यावतीने शहरातील नागरिकांना वेळोवेळी कोरोना नियमावलीच्या सुचनांचे पालन करण्याबात आवाहन करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!