Saturday, April 20, 2024

खंडणी आणि दहशतीसाठी बिल्डर संजय बियाणी यांची हत्या, हत्येचा अखेर छडा लागला! रिंदा गँगचा हात, 6 जणांना अटक; डीआयजी तांबोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ महाराष्ट्रासह इतर सहा राज्यात जाऊन तपास

नांदेड- बिल्डर संजय बियाणी यांच्या राज्यभर गाजलेल्या हत्येचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदेडमधीलच सहा जणांना अटक केली आहे. बियाणी यांची हत्या खंडणी आणि दहशत निर्माण करण्यासाठीच करण्यात आल्याचे उघडकीस आले असून यात रिंदा गॅंगचा सहभाग असल्याचेही पुढे आले आहे. या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी महाराष्ट्रासह इतर सहा राज्यात जाऊन तपास करून या हत्येचा छडा लावला आहे.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा एसआयटीचे प्रमुख विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या मागावर असलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोटारसायकलवर आलेल्या या दोन मारेकऱ्यांनी बियाणी यांच्या अगदी जवळ येऊन गोळ्या झाडून ही हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. ११९/२०२२ कलम ३०२,३०७,३४ भा. द. वि. सहकलम ३/२५ भा. ह. का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 55 दिवसांच्या कसून तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावला आहे.

बियाणी हे बाहेरून साडे अकरा वाजताच्या सुमारास घरी आले, तेव्हा आरोपींनी अगदी त्यांच्या कार जवळ येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार आणि हत्येची ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. या हत्येच्या तपासासाठी महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे १) इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर वय ३५ वर्षे २) मुक्तेश्वर ऊर्फ गोलु विजय मंगनाळे वय २५ वर्ष ३) सतनामसिंध ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल वय २८ वर्ष ४) हरदिपसिंघ ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंघ बाजवा वय ३५ वर्षे ५) गुरमुखसिंघ ऊर्फ गुरी पि. सेवकसिघ गिल वय २४ वर्षे ६) करणजितसिंघ पि. रघबिरसिंघ साहु वय ३० वर्षे सर्व रा. नांदेड यांना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक, नांदड परिक्षेत्र नांदेड यांचे आदेशान्वये एसआयटी ची स्थापना करण्यात आली होती. सदर एसआयटी चे प्रमुख विजय कबाडे (अपर पोलीस अधीक्षक) व त्यांचे मदतीला निलेश मोरे (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड), पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर (स्था. गु. शा. नांदेड) पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सपोनि पी. व्ही माने, पी. डी. भारती, संतोष शेकडे, शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, पोउपनि दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश गोटक यांचाही समावेश होता. तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस ठाणे विमानतळ यांचे मार्फतीने तपास करणे चालू होते.

या घटनेचा फायदा घेवून खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले. त्यांचेविरुध्द स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर व विमानतळ येथे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांचेशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!