Monday, October 14, 2024

खळबळजनक: किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटविले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट (जि. नांदेड) – शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील एका युवकाने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये आज शनिवारी दि.११ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान गोकुंदा येथून भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये आली होती. भाजीपाला,मसाले व अन्य दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून ती महिला भाजीपाला घेवून घराकडे परतत होती. इतक्यात तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते हा सोनपापडीच्या डब्यात पेट्रोल घेवून आला. आणि त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत ती महिला गंभीररित्या भाजली आहे.

प्रसंगावधान दाखवत व्यापाऱ्यांनी पाणी ओतून महिलेला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपी अर्जुन फरार झाला. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर बऱ्याच वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलीस वाहनातून जळीत महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. भाजलेल्या महिलेस ३ अपत्य असल्याचे सांगण्यात आले.

अर्जुन सातपुते याने पत्नीला का पेटविले, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. जळीत महिलेची तब्येत खालावल्याने रात्री उशिरा तिला आदिलाबादला हलविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात किनवटचे डीवायएसपी रामकृष्ण मळघणे यांच्या टीमने परिश्रम घेत आरोपी अर्जुन सातपुते याला जेरबंद केले. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी किनवट येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!