Saturday, June 22, 2024

खळबळजनक: महिलेस जिवंत जाळले; जागेच्या वादातून आधी डोक्यात वार करून बेशुद्ध केले आणि नंतर पेटवले, हदगाव तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ हातातील बांगड्यामुळे उलगडले खुनाचे रहस्य, आरोपी अटकेत

तामसा (जि. नांदेड)- येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वानवाडी येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ता खुपसे ह्या आपल्या शेतात दि. 27 में रोजी सकाळी नऊ वाजता शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेल्या होत्या. तेंव्हा शेतात मशागत करणारा आरोपी हणमंत दिगंबर खुपसे (वय 27) वर्ष याने लक्ष्मीबाई खुपसे हिच्या लाकडाने डोक्यात जबर वार करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात लाकडी ढिगावर टाकून जाळल्याची घटना घडल्याने खळबळजनक घटना घडली आहे.

तामसा पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील महिला लक्ष्मीबाई दत्ता खुपसे ह्या आपल्या घरुन शेतात शेळ्या चारण्यासाठी दि. 27 मे रोजी सकाळी सात वाजता गेल्या होत्या. तेव्हा आरोपी हणमंत दिगंबर खुपसे (वय 27) वर्ष रा. वानवाडी हा आपल्या शेतात मशागतीचे काम करत होता. तेंव्हा लक्ष्मीबाई खुपसे ही एकटी शेतात असल्याचे पाहुन जागेच्या जुन्या वादावरुन आरोपी हणमंत खुपसे याने लक्ष्मीबाई खुपसे हिच्या डोक्यात जबर वार करून बेशुद्ध केले व त्यानंतर लक्ष्मीबाईस स्व:तच्या शेतात लाकड़ी ढिग असलेल्या ठिकाणी नेले. आणि लक्ष्मीबाई खुपसे यांना ढिगावर टाकून चक्क जाळून टाकले.

मयत लक्ष्मीबाईचे पती दत्ता खुपसे हे आपली पत्नी शेतातून अजून घरी का आली नाही, याचा शोध घेत वानवाडी जंगलात आणि इतरत्र बऱ्याच ठिकाणी फिरले. पण त्यांना लक्ष्मीबाईचा ठावठिकाणा लागला नाही. मोठा मुलगा लोभाजी खुपसे हा पण वानवाडी येथील शिवारात आपल्या शेताकड़े गेला तेव्हा त्याला काही तरी उग्र वास येत असल्याने त्याने काहीतरी जळत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता उजव्या हाताच्या बांगड्या त्याला दिसून आल्या. ह्या बांगड्या माझ्याच आईच्या असल्याचे लक्षात येताच, त्याने ही बाब सर्वांना सांगितली. ही घटना वाऱ्यासारखी वानवाडी परिसरात पसरली होती.

या घटनेची माहिती तामसा पोलिसांना मयताच्या मोठा मुलगा लोभाजी दत्ता खुपसे याने दिली, तेव्हा घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे, पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले यांनी रात्री साडेबारा वाजता भेट दिली. या वेळी घटनास्थळी पाहणी करून आरोपी हणमंत दिंगबर खुपसे याला पकडण्यात आले. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील यांनी तामसा पोलिस स्टेशनला भेट दिली. लोभाजी दत्ता खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी हणमंत दिगंबर खुपसे याच्याविरुद्ध 302, 201 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अशोक उजगिरे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!