Wednesday, February 1, 2023

खाकीतल्या माणुसकीमुळे मिळाले खाकीला जीवदान

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अधिका-यांसह मित्रांच्या मदतीने वाहन चालकावर यशस्वी उपचार

सरपाते कुटुंबियांनी मानले एसपींसह सहकाऱ्यांचे आभार


नांदेड- नांदेड शहरातील पोलीस विभागाचा मोटार परिवहन विभाग गुुरुवारी (दि.16 डिसेंबर) सकाळी 10 च्या सुमारास नेहमीप्रमाणे गजबजून गेलेला. अधिकारी-कर्मचारी आपापल्या कामात मग्न असतांना अचानक पोलीस वाहन चालकाला अर्धांगवायुचा (पॅरॉलिसीस) अटॅक येतो. त्याला अवघ्या काही मिनिटात रुग्णालयात हलविले जाते. सहकारी आणि वॅचमेटच्या वॉटसअप ग्रुपवरून मदत घेतली जाते. एसपी प्सारमोदकुमार शेवाळेही तत्परतेने लाखाची मदत करतात. आणि वेळीच उपचार मिळाल्याने पोलीस वाहन चालकाचे प्राण वाचतात.

एवढी तत्परता पोलीस खात्यात पाहून खाकीतील सहकार्य करण्याची माणुसकी आजही जीवंत आहे. या तत्परतेचे सर्वत्र कौतूक होत आहे. दरम्यान, वेळीच सर्वानीच मदत केल्यामुळेच सरपाते कुटुंबिय अक्षरशः भारावून गेले आहे. 
पोलीस खात्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा, संकटकाळात मदत करण्याचे दूरच, उलट सोबत्याला कसे अडचणी आणता येईल, असे प्रयत्न झाल्याचे प्रकार काहीवेळा पाहायला मिळतात. पण याला काही सुखद धक्का देणा-या घटनाही घडत असतात. असाच एक हृदयस्पर्शी व माणुसकी जीवंत असल्याचा प्रत्यय देणारी घटना गुुरुवारी रोजी घडली.

नांदेड शहरातील पोलीस विभागाच्या मोटार परिवहन विभागात नेहमी प्रमाणे त्या दिवशी सकाळी 10 वाजता सर्वजण कर्तव्यावर हजर झाले होते. तेवढ्यात अचानक पोलीस वाहन चालक मनिष वामनराव सरपाते (ब.नं.2217) यांना अर्धांगवायुचा (पॅरॉलिस अटॅक) झटका आला. पो.कॉ.अनिलकुमार मुपडे व पो.कॉ.राहुल तारू व इतरांनी काही मिनिटात सरपाते यांनी काब्दे यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तसेच 30-40 हजाराची रक्कम तातडीने जमा करण्यात आली. पण आणखी पैसे लागणार होती. पण सरपाते कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने एमटी पीआय. श्री चव्हाण यांनी तातडीने पाच हजाराची मदत केली आणि मुपडे व तारू यांना पैशाची आणखी व्यवस्था करण्याचे सांगितले. त्यानुसार पो.कॉ.अनिलकुमार मुपडे व पो.कॉ.राहुल तारू यांनी मोटार परिवहन ग्रुप व 2007 बॅच या वाटसअप ग्रुपवरून सरपाते यांच्याबाबत माहिती देऊन मदतीचे आवाहन केले. याशिवाय शाळा, महाविद्यालयीन मित्रांनाही आवाहन करण्यात आले. अवघ्या 24 तासात 50 हजार रुपयांपेक्षाही अधिक मदत मिळाली.  दरम्यान, ही बाब समजताच पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पोलीस कल्याण निधीतून तब्बल एक लाखाची मदत दिली.

पोलीस निरीक्षक चव्हाण, सुपरवायझर हळदे, ऐएसआय सरदार सर, पो.कॉ.अनिलकुमार मुपडे, पो.कॉ. राहुल तारू यांनी वाहन चालक मनेष सिरपाते यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली. तातडीने मिळालेली मदत पाहून सरपाते यांची पत्नी व मातोश्री या दोघींना अश्रु आवरता आले नाहीत. साहेब, तुमच्यामुळेच माझ्या लेकराचे प्राण वाचले. लय उपकार झाले हो, असे बोलतांना  त्यांना गहिवरून आले होते. या बिकट प्रसंगात अगदी मोठ्या भावाप्रमाणे जबाबदारी सांभाळणारे पो.कॉ.अनिलकुमार मुपडे व पो.कॉ.राहुल तारू यांच्या पाठीवर मात्र वरिष्ठ अधिका-यांनी शाब्बासकी देवून पाठ थोपटली. एरवी करडी नजर व करारी बाणा असलेले पोलीस कर्मचारी एकमेकांच्या मदतीलाही धावतात, हेच या घटनेेने अधोरेखीत केले. या घटनेचे पोलीस दलात व नांदेड जिल्ह्यात कौतूक होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,691FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!