ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.
काळजी करु नका, उपचार सुरु आहेत
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शरद पवारांना फोन
शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन केला आहे. शरद पवार यांनी ट्विटमध्ये याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला, असं शरद पवार म्हणाले आहेत. मी त्यांनी केलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल त्यांचा आभारी असल्याचं देखील शरद पवार म्हणाले आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग देखील केलं आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻