Saturday, July 27, 2024

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नांदेड पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– राज्याच्या सिमेवर असलेल्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क तसेच इतर विभागांना नेहमीच दक्षता घ्यावी लागते. कर्नाटकाच्या सीमेवर देगलूर व मुखेड तालुक्यात नांदेड पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने दोन दिवसापुर्वी धाडसी कारवाई करुन सुमारे 20 लाख 50 हजार रुपये किंमतीचा अवैध दारु साठा जप्त केला. या कारवाई व दक्षतेबद्दल राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी समाधान व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील गृह विभागाचा आढावा घेतला. 

या आढावा बैठकीस पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी कानोडे उपस्थिती होते.
 
जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या कारवाईत राज्य उत्पादक शुल्क व पोलीस विभागाच्या कामाचे कौतुक केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!