Friday, December 6, 2024

गोळ्या घालून ठार करण्यात आलेले डॉ.हनमंत धर्मकारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी नांदेड बंदची हाक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड–  उमरखेड येथे कार्यरत असलेले व नांदेड येथील मूळनिवासी डॉक्टर हणमंत धर्मकारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने सोमवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. डॉ.हणमंत धर्मकारे हत्या विरोधी संघर्ष समितीच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी नांदेड येथील मूळ रहिवासी असणारे व उमरखेड येथे कार्यरत असलेले डॉक्टर हनमंत धर्मकारे यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर नांदेडमध्ये डॉ.हणमंत धर्मकारे हत्या विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या प्रकरणात तब्बल १० दिवस उलटून गेली असली तरी यातील प्रमुख आरोपी अटक नाही. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही. म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी डॉक्टर हनमंत धर्मकारे हत्या विरोधी संघर्ष समिती नांदेडच्यावतीने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवार, दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्य सरकारचे व प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी व या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी ही नांदेड बंदची हाक देण्यात आली असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.  हणमंत धर्मकारे हत्याविरोधी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!