Tuesday, October 15, 2024

ग्रामीण भागातही अवैध पिस्तुलांचा वापर; हिमायतनगरमध्ये पिस्तूलसह दोघांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- शहरात अनेकांकडून अवैध पिस्तुल जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. पण आता ग्रामीण भागातही अवैध पिस्तुलांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. हिमायतनगर पोलिसांनी अवैध पिस्तूलसह दोघांना अटक केली आहे.

हिमायतनगर शहर व परिसरात पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या गस्त दरम्यान दोन युवकांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवार दि. 22 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे करण्यात आली.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील संशयित निखिल संदीप देशमुख (वय 24) आणि विकास दत्ता ताडेवाड ( वय 20) हे दोघेजण विनापरवाना स्वतःजवळ पिस्तुल बाळगुन परिसरात दहशत माजवीत असल्याची गुप्त माहिती हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनुर यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलीस हवालदार कोमल कागणे, पवन चौदंते, जिंकलवाड आणि कुलकर्णी यांच्या पथकाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

एपीआय नंदलाल चौधरी यांच्या पथकाने सरसम येथे जाऊन अत्यंत गोपनीय पद्धतीने निखिल देशमुख आणि विकास ताडेवाड यांना ताब्यात घेतले. त्यातील निखील देशमुख याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी अन्य साहित्यही जप्त करून या दोघांची रवानगी हिमायतनगर पोलिस ठाण्यात केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून निखिल देशमुख आणि विकास ताडेवाड यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस हवालदार कोमल कागणे ह्या करत आहेत.

वजिराबाद पोलिसांनी केली तलवार जप्त

नांदेड शहरातील वजिराबाद पोलीसांनी कारवाई करून सुरज अशोक कोकरे (वय 19) राहणार पंचशीलनगर याला पकडून त्याच्याकडून विनापरवाना वापरत असलेली तलवार जप्त केली. एपीआय संजय निलपत्रेवार यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात सुरज कोकरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार आडे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!