ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुखेड (जि.नांदेड)- मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील एकाने आपल्या घराशेजारी गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली असून चाळीस हजार रुपये किंमतीचे सात किलो वजनाचे गांजाचे झाड जप्त केले आहे. ही कारवाई मुखेड पोलिसांनी चांडोळा येथे ही कारवाई केली.
चांडोळा तालुका मुखेड येथील कपील गंगाराम गायकवाड यांनी आपल्या घराशेजारीच गांजाचे झाड लावले होते. ही माहिती मुखेड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांना त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. काळे यांनी आपल्या पथकासह 27 मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास चांडोळा गावात जाऊन कपील गायकवाड यांच्या घराशेजारी असलेल्या गांजाचे झाड जप्त केले. जवळपास 38 हजार 450 रुपये किमतीचे सात किलो 690 ग्रॅम वजनाचे झाड शासकीय पंचासमक्ष जप्त करून कपील गायकवाड याला ताब्यात घेतले.
गजानन काळे यांच्या फिर्यादीवरून कपिल गायकवाडविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात कलम 20 (अ) (ब) व एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻