Sunday, May 19, 2024

चक्क कॉलेजसमोरच सुरू होता अवैध दारू विक्रीचा धंदा; पोलिसांनी केली कारवाई, गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या सिडको परिसरातील लातूर फाटा ते ढवळे कॉर्नर रस्त्यावर वसंतराव नाईक महाविद्यालयसमोर विनापरवाना, बेकायदेशीररीत्या दारू विक्रीचा धंदा सुरू होता. विदेशी दारू विक्रीचा हा अड्डा पोलिसांनी रविवार दि. १३ मार्च रोजी उध्वस्त केला. या कारवाईत साडेसहा हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बीट हवालदार संतोष रघुनाथ जाधव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. जाधव यांनी कारवाई केली. लातूर फाटा ते ढवळे कॉर्नर रस्त्यावर वसंतराव नाईक महाविद्यालयसमोर त्र्यंबक जयवंतराव ढाके (वय 44) राहणार नरसी (तालुका नायगाव) हा विनापरवाना, बेकायदेशीररित्या विदेशी दारू विक्री करत होता. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून साडे सहा हजार रुपयाची मॅकडॉल नंबर वन या कंपनीची विदेशी दारू जप्त केली.

संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शेख जावेद करत आहेत. महाविद्यालयासमोर सुरू असलेला बेकायदेशीर दारूचा अड्डा उद्ध्वस्त केल्याने नांदेड ग्रामीण पोलिसांचे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!