Saturday, November 9, 2024

चक्क पोलीस अधिकाऱ्याच्याच बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला; गुन्हा दाखल होताच पैसे पुन्हा खात्यावर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत उत्तम वरपडे पाटील यांच्यासोबत घडलेला प्रकार

नांदेड– येथील वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांच्या बॅंक खात्यावर डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार घडला. पण याबाबत गुन्हा दाखल होताच ठकसेनांनी पैसे परत बँक खात्यात टाकले. 

येथील वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांच्या बॅंक खात्यातून 96 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. पण वजिराबाद पोलीसांनी केलेल्या त्वरीत हालचालीमुळे ठकसेनाने 24 तासात 96 हजार रुपये परत उत्तम वरपडे पाटील यांच्या खात्यात पाठवले आहेत.

पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांचे पुत्र साई उत्तमराव वरपडे पाटील यांनी दि. 6 फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने मागवलेले कांही साहित्ये अपूर्ण पध्दतीचे आले होते. ही बाब, साहित्य घेऊन आलेल्या डिलेव्हरी बॉयला त्यांनी ही सांगितल्यानंतर त्याने कंपनीच्या कस्टमअर केअर विभागाचा नंबर दिला. पण, त्याने वेगळ्याच कुणाचा तरी नंबर दिला, त्यावर उत्तम वरपडे पाटील यांच्या फोनवरून साईप्रसाद वरपडेने कॉल केला. कॉल केल्यावर गोड- गोड बोलून त्या ठकसेनांनी उत्तम शंकरराव वरपडे पाटील यांच्या कर्नाटक बॅंक खात्यातून 96 हजार रुपये काढून घेतले.

यात ठकबाजी करणाऱ्याचा +916294566769 हा मोबाईल नंबर होता. वजिराबाद पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 29/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 सह तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला. वजिराबाद पोलिसांनी याबाबत त्वरीत हालचाली सुरू केल्या. त्यानंतर आज दि. 7 फेब्रुवारी रोजी पैशांवर ऑनलाईन डल्ला मारणाऱ्या ठकसेनांनी उत्तम वरपडे पाटील यांच्या बॅंक खात्यात 96 हजार रुपये परत जमा केले.

पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी तात्काळ केलेल्या हालचालींमुळे मला 24 तासात न्याय मिळाला, अशी भावना उत्तम वरपडे पाटील यांनी व्यक्त केली. गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंगे, शुभांगी कोरेगावे, शरदचंद्र चवरे, सायबर विभागाचे पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस कर्मचारी राठोड यांनी याकामी महत्वाची जबाबदारी पार पाडली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!