Sunday, June 16, 2024

चार राज्यात घवघवीत यश; नांदेडमध्ये भाजपाने काढली रॅली, फटाके फोडून जल्लोष

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत चार राज्यात भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल नांदेडमध्ये भाजपच्यावतीने संपूर्ण शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच अनेक चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भाजपा नेते- कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

भाजपा महानगर कार्यालयापासून भगवे झेंडे व मोदींचे कट आउट हातात घेऊन नेते- कार्यकर्त्यांनी घोषणा देत रॅलीला सुरुवात केली. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे संपर्क कार्यालय, आनंदनगर चौरस्ता, महाराणा प्रतापसिंह पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर, गुरुद्वारा चौरस्ता, ईतवारा, बर्की चौक, चौफळा, सराफा, दीपकसिंह रावत यांचे संपर्क कार्यालय, महावीर चौक, हनुमान पेठ, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर, तरोडा नाका या मार्गांवर रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करून आतिषबाजी करण्यात आली. भावसार चौक येथे रॅलीच्या समारोप प्रसंगी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक संतोष परळीकर यांच्यातर्फे अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली. रॅलीचे संचालन जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण अँङ. दिलीप ठाकूर यांनी तर आभार संघटन सरचिटणीस विजय गंभीरे यांनी मानले.

या रॅली आणि आतिषबाजीप्रसंगी महानगर अध्यक्ष प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, बाळू खोमणे,  दीपकसिंह रावत, अरविंद भारतीया, नगरसेवक राजू गोरे, दिलीपसिंग सोढ़ी, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, दिलीप ठाकुर, व्यंकटराव मोकले, शितल खंडील, अनिलसिंह हजारी, प्रभु कपाटे, वैजनाथ देशमुख, सुशिल कुमार चव्हाण, व्यंकटेश जिन्दम, राजेश कपूर, निरज चव्हाण, अनिल बोरगावकर, संदीप पावडे, व्यंकटेश साठे, शीतल भालके, कुणाल गजभारे, चंचलसिंह जाट, सुनील राणे, मारुती वाघ, आशीष नेरलकर, संदीप कऱ्हाळे, संतोष क्षीरसागर, मनोज जाधव, शंकर मनाळकर, संतोष परळीकर, धीरज स्वामी, राज यादव, अकबर खान पठान, अंकुश पार्डीकर, प्रतापसिंह खालसा, हुकुमसिंह ठाकुर, कंचन ठाकुर, लक्ष्मी वाघमारे, अनिल बोरगावकर, बबलू यादव, सागर जोशी, नरेश आलमचंदानी, लक्ष्मण पांचाळ, सचिन उमरेकर, जसवीरसिंग धुपिया, रूपेंद्रसिंह साहू, सुनील पाटील, आनंद पावडे, सुरेश निलावार, धनंजय नलबलवार, किरपालसिंग हुज़ूरिया, सोनू उपाध्याय, अरुण पोपळे, बालाजी सूर्यवंशी, गजानन उबाळे, दिलीप सावंत, अक्षय अमिलकंठवार, रुपेश व्यास, सागर जोशी, राम मस्के , अजय गवार ,जयसिंग ठाकुर, अनुप सिंग, अंबादास जोशी, अनिल लालवानी, चक्रधर कोकटे, आनंदीदास कानोले, अमोल कुल्थिया, बजरंग जोधले, शंकर वानेगावकर, चक्रधर कोकाटे, दिनेश मंडले, अशोक पूर्णेकर, अजय दहाड़े, पवन यादव, बाबु सुनकेवार, दिगंबर लाभशेटवार, कलेश्वर कदम, नारयण कुल्थे, रमेश गटलेवार, माधव वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!