Thursday, September 21, 2023

चोरट्याने फोडले आमदारांचे कार्यालय

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

कंधारमध्ये आमदार शामसुंदर शिंदे यांच्या कार्यालयात चोरी

टेबल खुर्च्यांसह त्यांचा फोटोही पळविला

कंधार– आमदार शामसुंदर शिंदे यांचे कंधार येथील संपर्क कार्यालय अज्ञात चोरट्यांनी दि. २२ डिसेंबर ते दि. ३० डिसेंबरच्या दरम्यान फोडले आहे. चोरट्यांनी आ. शिंदे यांच्या कार्यालयातून एक लाकडी टेबल, चार प्लास्टिकच्या खुर्च्या आणि आमदार शिंदे यांचा फोटो असा ऐवज लंपास केला. आमदारांचे कार्यालय फोडण्याची ही दुसरी वेळ असून स्थानिक पोलिस प्रशासनाबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कंधार- लोहाचे आमदार शामसुंदर शिंदे यांचे कंधार येथील बसस्थानक परिसरात ग्रामीण बँकेजवळ संपर्क कार्यालय आहे. त्यांचे कार्यालय गतवर्षीही अज्ञात चोरट्यांनी फोडून खुर्च्या व अन्य साहित्य लंपास केले होते. या घटनेचा तपास अद्याप लागला नसतानाच पुन्हा एकदा दि. २२ डिसेंबर ते दि. ३० डिसेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील लाकडी टेबल ३६०० रुपये किंमतीच्या चार खुर्च्या ३६०० रुपये आणि त्यांची एक फोटोफ्रेम असा आठ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी बद्रीनाथ शिवाजी मंगनाळे यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात दि. ३० डिसेंबर रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम गणाचार्य करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!