Wednesday, February 8, 2023

“जन गण मन”ने नांदेडचा स्टेडियम परिसर दुमदुमला;१५ हजार विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आवाज घुमला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील श्री गुरू गोविंदसिंगजी स्टेडियमवर यासाठी भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नांदेड येथील सुमारे 15 हजार विद्यार्थी व अधिकारी, कर्मचारी यांनी उस्फुर्त सहभाग घेवून आपले राष्ट्रप्रेम प्रकट केले.

यावेळी महापौर जयश्री पावडे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे, अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सविता बिरगे,  परदेशी, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुकाबले, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, उपमहापौर अब्दुल गफार, यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी 75 आकाराचे बोधचिन्ह तयार केले. 120 फुट लांबीचा तिरंग्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एकूण 60 शाळांमधील 15 हजार विद्यार्थी या समूह राष्ट्रगीत गायनामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे 34 जवानांसह दोन हजार 972 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. किड्स किंग्डम शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड, बासरीसह समूह राष्ट्रगीत गायन सादर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, प्रलोभ कुलकर्णी, संजय भालके, यांच्यासह तहसिलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,707FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!