Thursday, February 9, 2023

जादूटोणा, करणीविरुद्ध केले स्टिंग ऑपरेशन; तौफिक बाबाचा भांडाफोड, जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ पोलिसांच्या मदतीने अंनिसने केला भांडाफोड

नांदेड– बिलोली तालुक्यातील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावरील तौफिकबाबाकडे दैनंदिन स्वरूपाच्या समस्या किंवा आजारावरील उपचारासाठी स्थानिक व आजूबाजूचे लोक जातात. त्यासाठी तो 251, 501, 1001 रुपये घेतो. समस्या घेऊन गेलेल्या लोकांना तुमची समस्या किंवा आजार जादुटोणा किंवा करणीमुळे निर्माण झाली आहे, असे सांगत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाच पन्नास लोक गोळा करून अंगात दैवी शक्ती असल्याचा भास तो निर्माण करतो.

दिनांक 28 जानेवारी रोजी ईरन्ना बोरोड याचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी तो तौफिकबाबाकडे गेला. त्याला आपल्या पायाच्या त्रासा बद्दल सांगितले. तौफिक  बाबांने अंगात आल्याचे भासवून “तुमचा त्रास दवाखान्यातल्या नसून रूक्‍मीनबाई बोरोड यांनी तुमच्यावर मंत्राने करणी, जादूटोणा केल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असल्याचे सांगितले. नाव सांगितल्यामुळे रूक्‍मीनबाईकडे लोक संशयाने बघायला लागले. त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेडकडे तक्रार दिली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य सम्राट हटकर, जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टिंग ऑपरेशनची योजना बनवली. त्या योजनेनुसार दि. 4 फेब्रुवारी रोजी सापळा रचून तोफिक बाबाचा भांडाफोड केला आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

या भांडाफोड प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सय्यद एम. झेड, पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे जी. बी. भारत फंताडे, कोरनोळे  बी. एस. आधी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तसेच या मोहिमेत अंनिसचे बिलोली चे कार्याध्यक्ष फारुक शेख, बालाजी एलगंद्रे, मोहन जाधव, सायलू कारमोड यांची मदत झाली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,706FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!