Wednesday, July 24, 2024

जाळ्यात ओढून अश्लील क्लिप बनवली, नंतर धमकी देऊन खंडणीची मागणी; नांदेडमध्ये दोन महिलांसह पाच जणांना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

• भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड– एका युवकाला जाळ्यात ओढून अश्लील क्लिप तयार करून नंतर ही क्लिप वायरल करण्याची धमकी धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली असून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर येथील युवकाला प्रेमाचा जाळ्यात ओढून आपल्या घरी बोलावून त्याचे एका महिलेसोबत अश्लील चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दीड लाख रुपये खंडणी मागून त्यापैकी 40 हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन महिलांसह इतर तिघांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहेत. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून लवकरच स्थागुशाचे पथक त्यांना भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.
भोकर येथील चिखलवाडी भागात राहणारा अथर्व विलास डुबेवार (वय २१) हा १३ जानेवारी २०२४ रोजी भोकरच्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गेला होता. यावेळी बाजारामध्ये त्याला नीता नावाची एक महिला भेटली. तिने त्याच्यासोबत संवाद करून माझा फोन घरी राहिला आहे, तुमचा फोन वापरण्यासाठी देता का असे म्हणून अथर्व डुब्बेवार याचा फोन घेऊन तिने अथर्वच्या मोबाईलवरून तिच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला आणि त्यानंतर त्याचा फोन परत केला.

त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी अथर्व याला फोन करून मी नीता बोलते असा संवाद साधत तू नांदेडला आल्यानंतर मला कॉल कर, आपण भेटूया, माझे तुझ्याशी काम आहे असे सांगितले. यानंतर १२ फेब्रुवारी रोजी अथर्व डुब्बेवार हा नांदेडला आला. यावेळी त्याने नीता नावाच्या या महिलेला फोन लावला तिने प्रकाशनगर कॅनाल रोड येथे बोलावले. घरी घेऊन गेल्यानंतर एका रूममध्ये बसविले. त्यानंतर दुसऱ्या रूममधून तिची सहकारी महिला आणि दोन पुरुष त्याच्या हॉलमध्ये आले, त्या दोन्ही पुरुषांनी अथर्व डुबेवार याला मारहाण केली आणि कपडे काढून त्या दोघांसोबत आलेल्या एका महिलेसोबत नग्न अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ काढला.

त्यानंतर अथर्वला दीड लाख रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिल्यास तुझा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करू असे धमकावले. यावेळी अथर्व याने आपल्या खात्यातील चाळीस हजार रुपये फोन पे द्वारे ९८६०९०१००३ या विशाल कोटीयान नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेल्या मोबाईलवर पाठवले. दुसऱ्या दिवशी सुरेश वाघमारे, नितीन आणि विशाल यांनी परत फोन केला. राहिलेले एक लाख दहा हजार रुपये दे नसता जीवे मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेल्या अथर्व डुब्बेवार याने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार गंभीर असल्याचे लक्षात घेतल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना ही माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्याकडे ही माहिती दिल्यानंतर त्यांनी फौजदार दत्तात्रय काळे यांचे पथक कार्यरत केले.

या पथकाने विशाल कोटियन, सुरेश, वाघमारे, नितीन, नीता आणि तिच्या एका सहकारी महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून लवकरच ते भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे फौजदार श्री काळे यांनी सांगितले. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!